Wednesday 17 January 2024

छोटी आणि सुंदर गावे, संत्र्यांच्या बागा, अल्गार्व, पोर्तुगाल (भाग ३)

 (मराठी-English)

अल्गार्व, पोर्तुगाल (भाग ३)
जेव्हा तुम्ही युरोपमध्ये फिराल तेव्हा नेहमीची ठिकाणे करून झाल्यावर छोट्या छोट्या गावातून फेरफटका मारण्यासाठी वेळ राखून ठेवा. इकडे तुम्हाला काही बघण्यासाठी रांगेत उभे रहावे लागणार नाही, कोठेही वर्दळ दिसणार नाही, पण निवांतपणा जाणवेल. जुनी वयस्कर माणसे छोट्या छोट्या सुंदर कॅफे मध्ये बसून कॉफी/बियर चा आस्वाद घेताना दिसतील, लहान निर्मनुष्य गल्ल्या तुम्हाला गावचा निवांतपणा अनुभवायला देतील, घराच्या समोरच्या निटनेटक्या, आखीव रेखीव सुंदर बागा तुम्हाला घड्याळ पाहायची उसंतच देणार नाहीत, गावातले लहान पण उत्तम स्थितीत असलेले किल्ले तुम्हाला इतिहासाच्या गोष्टी सांगतील. हे सगळे पोर्तुगालमध्ये फिरताना जाणवते पण युरोपियन शैलीची (लाकडाची), ठराविक साच्याची घरे दिसत नाही. कदाचित पाच शतकांचा अरबांच्या अंमलामुळे येथील घरांवर, गावाच्या नावावर आणि संस्कृतीवर अरब संस्कृतीचा प्रभाव जाणवतो. त्यांनी तो बदलण्याचा किंवा ठिकाणांची नावे बदलण्याची उठाठेव केलेली दिसत नाही. इतिहास म्हणजे भुतकाळातील ओझी वर्तमानकाळात न नेता भविष्यकाळ चांगला करणे. ह्यातच शहाणपण असते.
लहान गावातील घरे ही कोकणातील चिरा ( laterite stone) सदृश्य दगडापासून बनताना दिसली आणि महत्त्वाचे म्हणजे बहुतेक सगळी घरे कौलारू होती. मोठ्या टाउन मधली घरांचा दर्शनी भाग हा Ceramic टाइल्सने सुशोभित केलेला असतो. या टाइल्सना इकडे अझुलेजोस (Azulejos) म्हणतात आणि यांचा चर्च, ट्रेन स्टेशनवर सुद्धा मुबलक वापर केला गेला आहे. या टाइल्समध्ये खूप फुलांचे (बहुतेकवेळा निळ्या) डिज़ाइन केलेले आढळले. या टाइल्स नसतील तर पिवळ्या/निळ्या /पांढऱ्या रंगानी ही घरे न्हाऊन निघालेली असतात.
माळरानावर विहिरी असलेल्या पण कुंपण नसलेल्या, संत्राच्या फळांनी बहरलेल्या बागा तुमच्या मनाला आणि डोळ्यांना उल्हासित करतील यात काहीच शंका नाहीत. आम्हाला त्या बागेतून फिरवासे वाटत होते पण बाग मालकाच्या परवानगीशिवाय फिरणे आम्हाला ईष्ट वाटले नाही. जर कोणी ज्या मेहनतीने बागा निर्माण केल्या आहेत त्या विश्वासाला का तडा जाऊ द्यायचा या प्रेरणेने तिकडे संत्र्याची चोरी होत नसावी कदाचित. इकडे रस्त्याच्या दुभाजकावर, पायऱ्यांचा बाजूला, पठारावर, सगळीकडे छोटी-मोठी संत्रांची झाडे दिसतात आणि भरपूर फळे आली असतात. ती सहज चालता फिरता सहज तोडता येत असतानासुद्धा, ती तोडून नेताना कोणीच दिसत नाही. सगळ्या कॅफेमध्ये ताज्या संत्र्याचा ज्यूसच्या पाट्ट्या लागलेल्या असतात, आणि हा चवीला खूपच अप्रतिम लागतो. मुलीला या चवीची सवय नसल्याने मी प्रत्येकवेळी तो मागवून मीच संपवायचो.
यावेळी रिसोर्टच्या जेवणाने खूपच निराश केले पण सुदैवाने आम्ही हाफ बोर्ड घेतले होते. त्यामुळे स्थानिक कॅफे आणि रेस्टोरेंट ट्राय करता आले. रिसॉर्टमध्ये राहणाऱ्या ब्रिटीश पर्यटकाने जवळ असलेले इटालियन कॅफे जेवणासाठी सुचवले. म्हणून सॅन मार्टिनोमध्ये ख्रिसमसच्या दिवशी गेलो. बाल्कनी मधून दिसणाऱ्या सूर्य, वाळू आणि समुद्र च्या त्रिवेणी संगमाने मन आणि अस्सल इटालियन पिझ्झा, पास्ताने पोट चांगलेच तृप्त केले. तुम्हाला जर पिझ्झा हट किंवा डॉमिनोज सारख्या डुप्लिकेट इटालियन फ़ूड चेनची सवय असेल तर तुम्हाला अस्सल इटालियन पदार्थ कदाचित वेगळी लागेल. इकडे जेवण देताना पेरी पेरी सॉसची छोटीशी बाटली देतात आणि खरोखर हा तिखट सॉस जेवणाला लज्जत आणतो.
तविरा - हे मच्छीमारांचे गाव म्हणून ओळखले जाते. ओल्ड टाउनच्या रस्त्यावर तुरळक आमच्यासारखी प्रवासाची आयटेनरी न बनवणारी लोक फिरत होती. आम्ही ख्रिसमस ईव ला गेल्यामुळे सगळेच बंद होते, परंतु Little India नावाचे रेस्टोरेंट उघडे होते. सुदैवाने आम्ही शेवटचे कस्टमर असल्यामुळे आम्हाला जेवण मिळाले.
अल्बुफेअरा - जरी हे समुद्र किनाऱ्यासाठी ओळखले जात असले तरी ओल्ड टाउन मध्ये भरपूर रेस्टोरेंट आणि कॅफे असून भरपूर वर्दळ असलेले मोठे गाव आहे. माझ्यामते ही सर्वोत्तम अशी जागा आहे जिकडे तुम्ही राहून आजूबाजूची गावे बघू शकता. फारो एयरपोर्ट ४० मिनिटच्या अंतरावर आहे. आम्हाचे तीन दिवसच हे गाव बघण्यात गेले.
सिल्व्हेस - हे एक छोटेसे टुमदार, कमी वर्दळीचे, पांढऱ्या रंगाचे गाव असून मध्यभागी उंचावर किल्ला आहे.
अल्टे - अल्बुफेअरावरून या गावी येणारा छोटासा रोड तुम्हाला आयुष्यभरच्या आठवणी देऊन जाईल. हे पिटुकले गाव धबधबा आणि गरम पाण्याच्या कुंडासाठी ओळखलं जाते. आम्ही चर्चच्या समोरच्या कॅफे मध्ये fonte Nova स्थानिक फ़ूड घेतले.
मोणचिक- हे अल्गार्व मधले सर्वात उंचावरचे गाव. सिल्व्हेस ते मोणचिक हा रस्ता मला पोलादपूर ते महाबळेश्वरची आठवण देऊन गेला. याचा वीडियो मी पहिल्या भागात टाकला आहे. हे एक महाबळेश्वर किंवा ऊटी किंवा मुन्नार आपण म्हणू शकतो.
ओल्हवो, लागोस, लौले ही गावे आम्हाला वेळेअभावी करता आली नाहीत.
क्रमश:
--------------
Algarve, Portugal (Part 3)
When you travel through Europe, always take the time to explore small villages off the beaten path. Here, you won't find prominent landmarks, but you'll experience authenticity. Old folks sitting in quaint cafes, sipping coffee or beer, will give you a glimpse into village life. Narrow, cobblestone streets, beautifully maintained front gardens will give you a sense of the tranquility of the village. Small yet well-preserved forts in picturesque locations will narrate stories of history. While these aspects are common throughout Portugal, however, the European style wooden house are missing. Perhaps five centuries of Arab rule has influenced the houses, village name and culture of Portugal. Portuguees don't seem to have bothered to change it or change the names of the places. History is about improving the future without bringing the past into the present.
In small villages, houses built with laterite stones, similar to Konkan's 'chira,' are a common sight. I noticed that these houses have roofs similar to typical Konkani old houses.. In towns, you'll find homes adorned with beautifully crafted ceramic tiles. Locally known as 'Azulejos,' these tiles, with intricate floral designs, are often used in churches, Palaces and train stations. Otherise yellow is colour you see everywhere in Portugal.
There is no doubt that when you see orchards blooming with oranges and big wells, will delight your mind and eyes. Though we were tempted to wander through those gardens, we couldn't explore them without the owner's permission. I was a bit surprised when there were no fense or restrictions around the orchards. Along the roadside, on the side of the stairs, on the plateau, all around, small and large orange fruit-bearing trees are visible, and abundantly laden with fruits. In all the cafes, you'll find refreshing juices made from fresh fruits, and this taste is truly exquisite.
During this time, the resort's dining left us a bit disappointed, but thankfully, we had opted for half board. Due to this, we explored local cafes and tried restaurants. The British tourist staying at the resort recommended us an Italian cafe for meals. So, on Christmas day, we went. The view from the balcony (combination of Sun-Sand-Beach), creating a delightful atmosphere. We enjoyed authentic Italian pizza and pasta, satisfying our taste buds. If you prefer pizza hut or Domino's style dummy Italian food chains, You may find authentic Italian cuisine different. Here, with every meal, they provide a small bottle of peri-peri sauce, and truly, this spicy sauce adds a unique flavor to the meal.
Tavira - The village is known as the fishermen's village. Since we went on Christmas Eve, everything was closed, but the restaurant named Little India was open, and it was about to close. Fortunately, we became their last customers, so we got our meal.
Albufeira - Although it is recognized for the coastline, it is a large village and the Old Town filled with numerous restaurants and cafes. In my opinion, this is the best place where you can stay and explore the nearby villages. The Faro Airport is within a 40-minute distance. We spent three days exploring this village.
Silves - This is a small, quaint village, featuring a castle perched on a hill in the central part.
Alte - The tiny road coming from Albufeira will take you on a nostalgic journey, leaving you with memories for a lifetime. Alte is famous mostly for its natural features, the water springs and waterfall. We enjoyed local cuisine at Fonte Nova, a cafe near the church.
Monchique - Here you will find the highest point on the Algarve. The road from Silves to Monchique reminded me of Poladpur to Mahabaleshwar Scenic Drive. I have included this video in the first part. You can think of it as Mahabaleshwar, Ooty, or Munnar. Fóia is the highest mountain of Algarve, Portugal. It is part of the Serra de Monchique range.
We could not do Olhão, Lagos, Loulé villages due to lack of time.
Continue …

Swapnil Rane

विलोभनीय समुद्र किनारे आणि सोनेरी वाळू, अल्गार्व, पोर्तुगाल (भाग २)

मराठी-English
विलोभनीय समुद्र किनारे आणि सोनेरी वाळू, अल्गार्व, पोर्तुगाल (भाग २)
मागच्या भागात म्हटल्याप्रमाणे अल्गारमध्ये निसर्गाची उधळण भरपूर आहे पण त्यात विविधतासुद्धा आहे. माझ्यामते डोंगर आणि समुद्राचे संयोजन पर्यटनाच्या दृष्टीने सर्वोच्च प्राधान्यामध्ये येतात. कपलसाठी उंच कडाच्या (cliffside trails) बाजूने सुंदर ट्रेक होतो आणि कुटुंबियासाठी समुद्राच्या गुहांनी वेढेलेली सोनेरी वाळू खूप आकर्षित करते. जर डोंगर आणि समुद्राचा कंटाळा आला तर सुंदर छोटी गावे आणि माळरानवरच्या व डोंगरवरच्या संत्राच्या बागा म्हणजे चेरी ऑन टॉप.
आम्ही सुरवातीला सागरी गुहा असलेल्या मोठ्या चुनखडीच्या कमानी असलेल्या किनाऱ्यांना भेटी दिल्या. इकडे पोहचण्यासाठी लहान, मोठे, वृद्ध सर्वांसाठी प्रशासनने जबरदस्त सोय केली आहे. तुम्हाला जर डोंगरावरून किनारा आणि दूरवर समुद्र बघवायचा असेल तर कड्यावर जाण्यासाठी लाकडी मार्ग आणि टोकावर सेल्फी सदृश्य स्टेज बांधले आहे. जर तुम्ही अडवेंचर्स असाल तर एक छोटीशी वाट पकडून कड्यावरुन समुद्राला समांतर असे चालत जाऊ शकता. वरील दोन्ही पर्याय नको असतील तर काहीठिकाणी लाकडी किंवा सीमेंटच्या पायऱ्या बांधल्या आहेत आणि त्यासुद्धा हेल्थ एंड सेफ्टी विचारात घेऊन. काही ठिकाणी चक्क सरकते जिने आणि एलिव्हेटर्स बांधले आहेत किनाऱ्यावर जाण्यासाठी.
लागोसचे समुद्र किनारे - स्नेहलने लागोसच्या आजूबाजूच्या सुंदर किनारे आधीच शोधून ठेवले होते म्हणूनच आम्हाला उंच कडे असलेले किनारे बघता आले.
डॉल्फिन सफारी - अल्बुफेरा आणि लागोस वरून डॉल्फिन बोट सफारी उपलब्ध आहेत आणि यामध्ये तुम्ही मोठ्या गुहा आतून आणि बाहेरून बघू शकता. आम्ही अल्बुफेरा वरून स्पीड बोट घेतली आणि सलगडोसच्या किनारपट्टीवर दोन डॉल्फिननी दर्शन दिले. जेव्हा बोटीने बेनेगिलच्या किनारा सोडल्यानंतर खोल समुद्रात नेले तेव्हा कुठे परत दोन छोट्या डॉल्फिनला जवळून बघता आले. जर तुम्ही छोटी बोट कराल तर तुम्हाला जास्त डॉल्फिन बघता येतील.
बेनेगिल गुहा - ही एक नैसर्गिक आश्चर्य असणारी जागा आहे. या गुहेवरचा छतावरील भागात मोठे भगदाड पडले आहे आणि त्यातून सूर्यप्रकाश येतो. पाण्याचा प्रवाहामुळे एक छोटासा किनारा सुद्धा निर्माण झाला आहे. या छोट्या किनाऱ्यावर येण्यासाठी २ माणसी बोट (Kayaking) स्वतः चालवत यावी लागते. एक जण चक्क बाजूच्या मोठ्या किनाऱ्यावरून या गुहेत पोहत येत होता.
अल्बुफेरा - आतापर्यंत मी बघितेतल्या समुद्र किनाऱ्यामधला सर्वोत्तम किनाऱ्यांपैकी एक.
क्रमश:
पुढच्या भागात - छोटी आणि सुंदर गावांबद्दल, संत्र्यांच्या बागा, आणि पोर्तुगालची दुसरी बाजू - डंकी व देशी माणसे.
——————
The golden sandy seashore, Algarve, 🇵🇹 (Part 2)
Algarve has emerged as a nature-rich destination, filled with diverse landscapes. According to me, the combination of hills and the sea takes precedence in terms of tourism. For couples, there are beautiful treks along the cliff sides and for families, the golden sand surrounded by sea caves is a big draw. If you get tired of the mountains and the sea, the pretty little villages and orange groves on the slopes and hills are the cherry on top.
We initially visited beaches with massive cliffs and sea caves. To reach here, the administration has made tremendous efforts for everyone, be it young, old, or elderly. If you wish to see the sea from the mountains and far beyond, they have constructed wooden walkways and platforms for selfie-worthy scenes. For adventure seekers, a short walk along the cliff can be a thrilling experience. If both the above options are not desired, wooden or cement steps are constructed in some places and all safety and health measures have been considered. Some spots have escalators and elevators installed for reaching the shores.
Lagos Beaches - Snehal Masalkar Rane did good research and found amazing seashores with cliffs at Lagos.
Dolphin boat safaris are available from Albufeira and Lagos and allow you to see the large caves inside and out. We took a speed boat from Albufeira and had a couple of dolphin sightings off the coast of Salgados. When the boat left the Benagil coast and entered the open sea, we came across two small dolphins up close. If you take a small boat, you are likely to see more dolphins.
Benagil Cave - This is a place of natural wonder. Due to the massive landslide in this cave, sunlight enters. Because of the flow of water, a small shore has also been formed. To reach this coast, a small boat operated by two people (Kayaking) is required.
Albufeira is one of the best beaches I've ever seen.
Continue..
Next part - Quaint towns and villages, Citrinos do Algarve and Dunki

Swapnil Rane

अल्गार्व, पोर्तुगाल (भाग १)

 (मराठी-English)

अल्गार्व, पोर्तुगाल (भाग १)
जश्या नाताळच्या सुट्ट्या जवळ येतात तसे इंग्लंडवासीयांना हिवाळी सूर्य सुट्ट्याचे (विंटर सन हॉलिडे) वेध लागतात. जिकड़े सूर्य,ऊन, समुद्रकिनारे मुबलक आहेत त्या स्पेन, स्पैनिश केनेरी आइलैंड, पोर्तुगाल ला जाणारी बुकिंग्स ३/४ महिने आधीच फुल होऊन जातात. ह्या सुट्ट्या खरोखरच “हॉलिडे” असतात, त्या Eat-Sleep-Eat Repeat या प्रकारात मोडतात. लहान मुले असलेल्या कुटुंबासाठी दगदगीच्या जीवनापासून एका आठवड्यासाठी मुक्तीच असते, ज्यामध्ये प्रवासाचा कार्यक्रम बनवण्याची गरज पडत नाही. एकदा बुकिंगचे पैसे भरले की प्रवासी कंपनी विमान बुकिंग, एयरपोर्ट ट्रान्सफर, हॉटेलची व्यवस्थित काळजी घेतात.
अल्गार्व हा प्रांत पोर्तुगालच्या दक्षिण भागात येतो आणि यामध्ये लागोस, तविरा, अल्बुफेअरा, ओल्हवो, सिल्व्हेस, लौले सारख्या सुंदर गावांचा समावेश होतो. पहिला युरोपियन पोर्तुगीज वास्को ड गामा ज्याने युरोप मधून भारतात पोहचण्याचा समुद्र मार्ग़ शोधून काढला त्यामुळेच कदाचित पोर्तुगीज भाषेचा प्रभाव दक्षिण भारतीय आणि मराठी भाषांवर खूप दिसून आला. भारतीय भाषेचे काही शब्द पोर्तुगीज भाषेमध्ये समाविष्ट झाले आहेत. आमची सुरवात बटाटा, अननस, नाताळ या पोर्तुगीज शब्दाने झाली. पगार, पाद्री, पाव, चावी, इंग्रजी, फालतू असे अनेक पोर्तुगीज शब्द मराठी भाषेत आले आहेत. Arnika Paranjape चा यावर सुंदर यूट्यूब ब्लॉग आहे. (https://www.youtube.com/watch?v=DexoS91rZNY&t=688s)
पण यावेळी विमानतळावरुन रिसॉर्टला जाणाऱ्या बसचे भाडे खूपच महाग असल्याने कार चा पर्याय निवडला आणि आमचे म्हणजे माझे हॉलिडे एडवेंचर ट्रेवल झाले. परंतु कार मुळेच सुंदर गावे बघता आली. जेव्हा आम्ही आमची भाड्याची कार निवडायला गेलो तेव्हा एजेंटने माझे आडनाव व्यवस्थित उच्चारून मला चांगलाच आश्चर्यचा धक्का दिला. त्याने पोर्तुगीज आणि ब्रिटीश लोक एकच आडनाव कसे उच्चार करतील याच्या नक्कला देखील करुन दाखवल्या. मागच्या पॅरिस ट्रिपच्या अनुभवामुळे युरोप मध्ये कार ड्राइव चा आत्मविश्वास आला होता. परंतु यावेळी माझी कार न घेता पहिल्यांदा डाव्या बाजूला स्टीअरिंग व्हील असलेली गाडी चालवणार होतो, त्यामुळे थोडी धाकधूक होती. सगळे कागदी सोपस्कार पार पाडल्यावर मुलीने चाइल्ड सीट मऊदार नसल्याची तक्रार चालू केली आणि मी माझ्या जुन्या काळात गेलो. आम्ही कसा “येष्टीने” (महाराष्ट्र स्टेट ट्रांसपोर्ट बस) १२-१५ तास पत्राच्या सीट वर बसून कोकणात कसा प्रवास केला हे सांगण्यात माझी १५/२० मिनिटे गेली. अनेक मिन्नतवारीनंतर मॅडम राजी झाल्या ४० मिनिटांचा प्रवास रिसोर्टपर्यंत करण्यासाठी. हुश्श..
क्रमश:
--------
Algarve, Portugal (Part 1)
As the Christmas holidays approach, English people look forward to the Winter Sun Holiday. Where the sun, sand, and sea meet, places like Spain, the Spanish Canary Islands, and Portugal get fully booked three to four months in advance. These vacations are truly a "holiday," where people indulge in the Eat-Sleep-Eat Repeat mode. For families with kids, it's a week of freedom from the hustle and bustle of daily life, with no need to plan a travel itinerary in advance. Once the booking is made, travel companies take care of flight bookings, airport transfers, and hotel arrangements.
Algarve is a region in the southern part of Portugal, including beautiful villages like Lagos, Tavira, Albufeira, Olhão, Silves, and Loulé. The first European Vasco da Gama, who discovered the sea route from Europe to India, was Portuguese, and perhaps this is why Portuguese influence is evident in South Indian and Marathi languages. Many words from Portuguese have been incorporated into Marathi, starting with Batata (potatoes), Ananas (pineapple), and Natal (Christmas). Words like Pagar (salary), Padri (priest), Pao (Bread), and Chavi (Key) have also found a place in Marathi. Arnika Paranjape has a beautiful YouTube blog on this (https://www.youtube.com/watch?v=DexoS91rZNY&t=688s).
However, since the resort bus fares were exorbitant, we chose the option of renting a car, and our holiday turned into a personalized adventure trip. But the beautiful villages could be seen only because of the car. When we went to pick up our rental car, the agent surprised me by pronouncing my last name correctly. He also mimicked how the Portuguese and British people pronounce the same surnames differently. My previous experience of driving in Paris boosted my confidence in driving in Europe. However, this time, manoeuvring the car with the steering wheel on the left side was a bit nerve-wracking. After completing all the paperwork, my daughter complained about the hardness of the child seat. I remembered my journeys in the "ST" (Maharashtra State Transport Bus), sitting on a sheet metal seat with no cushion and no Air con for 12-15 hours to travel to Konkan. After several pleadings, little madam reluctantly agreed to cover the 40-minute journey to the resort. Phew!--
Continue....

Swapnil Rane


अण्णा आणि जन आंदोलन ....

अण्णा आणि जन आंदोलन ....
१२ दिवसा नंतर अण्णाचे उपोषण संपले. खरंच अण्णा जिंकले का? या उपोषणाने सर्व गोष्टी साध्य केल्या का? या प्रश्नांची उत्तरे आता मिळतील का? 
इथे युके मध्ये बसून इंडिया मधील  परिस्थितीचा आढावा घेणे कठीण आहे पण  येथे बसून तटस्थ विचार मात्र करता आला. तो इंडिया मध्ये असताना करता आला नसता. अण्णा यांना विरोध म्हणजे सरकार आणि भ्रष्टाचाराला पाठिंबा, असे सरळ दोन तट. 
जन लोकपाल बिलबद्दल बोलू. ज्या तीन मागण्या अण्णा लावून धरत आहेत त्या भविष्यामध्ये भारतीय लोकशाहीला मारक नाही आहेत का ? आपण फक्त भ्रष्टाचारचा  विचार करत आहोत का?
मान्य आहे या दोन वर्षात खूपच भ्रष्टाचार झाला, दोषी मंत्र्यांवर कारवाई पण झाली. पण ती पुरेशी नव्हती.  लोकांचा आवाज दाबला जात होता तो अण्णा च्या आंदोलना मुळे मोकळा झाला इतकेच. 
खरे सांगायचे झाले तर आपण भारतीय जनेतला देवदूत ची गरज नेहमीच भासते.. मग आपण तो चित्रपटातून किंवा खेळाच्या माध्यमातून देवदूत उभे करतो. मग तो चित्रपट रंग दे बसंती, लागे राहो मुना भाई यातून वक्ता होतो इतकेच.  खेळाच्या माध्यमातून सचिन ला उभे करतो. असो. 
सांगायचा मुद्दा हा असा कि या आंदोलनात सहभागी झालेल्यांनी ते जन लोकपाल बिल वाचले असेल का? उत्तर हे नाहीच असेल. आपण आंदोलनात सहभागी होतो आहोत, पण जनतेने कधी विचार केला आहे का आपण यालाच खतपाणी घालतो.. बरोबर आहे आपण situation ला शरण गेलो असतो कारण आपण system नाही बदलू शकत. आणि ती अशी नाही बदलणार जादू ची काडी फिरवल्या सारखी. 
पण आपण शपथ घेऊ शकतो कि आपण भ्रष्टाचार नाही करणार आणि होऊ ही नाही देणार जेव्हा प्रत्येक जण हा संकल्प सोडेल तेव्हा कुठे याचा पाया ठिसूळ होईल. 
हि लढाई इथे संपत नाही मित्र हो.. किंवा जन लोकपाल बिल हि याला संपवू शकेल. आपण भाबडा आशावाद सोडूया. 

Wednesday 28 August 2013

मेरे देश की धरती …

मेरे देश की धरती ….

चक्क २ वर्ष झाली ब्लोग सुरु  करून, पण सातत्य नाही ठेवू शकलो.  परत एकदा  Track वर परतण्याचा विचार आहे.

फक्त २ दिवस आहेत इंडिया ची flight पकडायला . जवळ जवळ ३० महिन्याने इंडिया ची भेट होणार… मन आतुर झाले आहे… कामा वरच लक्षच उडाले आहे.  कधी एकदा परत भेटतात माझे मित्र, मेत्रिणी , नातेवाईक आणि आई- पपा … असे झाले आहे.

कसे  स्वागत होईल ते माहिती नाही … पण खूप बदल नक्कीच  झाला असेल …… भारतात, परिस्थिथित  आणि  माणसात सुद्धा …  पण भावाचा सल्ला उपयोगात येईल … :)

एकच आशा ठेवावी … पूर्ण ट्रीप  मध्ये पोट नीट राहावे …    

Saturday 17 September 2011

नातं

आज खूप दिवसांनी खरडावसे  वाटते आहे . का कळत नाही .. मनाचा भुंगा झाला आहे.. आपण ज्या साठी पळतो , ज्या स्वप्ना न साकारण्यासाठी जीवाचे रान करतो.. ते नक्की मिळेल का ... आज किती तरी गोष्टींचा त्याग करतो आहे.. फक्त एका ध्येयासाठी.. मग असे का वाटत राहते... जे ध्येय  गाठण्यासाठी जो आटापिटा चालू आहे त्या साठी आपण कित्येक गोष्ट का गमावून बसतो आहे..  नाही कळत मनाला... कसे आवरणार मनाला.. 
कोणी समजून घेईल का.. कधी कधी खूप वाईट वाटते की आपण स्वतःला तरी न्याय देतो आहे का? का फक्त घडाळ्याच्या काट्यावर नुसते पळत राहणार... काहीतरी गमावत असल्याची जाणीव सारखी का जाणवत राहते.. 
मी नात्याला एक जवाबदारी मानून न्याय देतो आहे का.. मी कोणाचा मुलगा , कोणाचा नवरा , कोणाचा  भाऊ लागतो आणि कोणाचा जिवलग मित्र ...  मग त्या नात्याशी असणाऱ्या जवाबदारी ची जाणीव आहे का मला ... 
खरे सांगायचे झाले तर मला नाते ( ते कोण ते हि असो ) कधी निभावता आले नाही...अजून हि निभावता येत नाही ... मला तरी असे वाटते.. 
नातं निभावणे खूपच कठीण असते का? काही गोष्टी आपण गमावल्याबद्दल त्याची किंमत त्यानंतरच  आपल्याला का जाणवते ... का त्या गोष्टीला परिस्थिती कारणीभूत असते .. नाही ठावूक या मनाला. ज्या गोष्टी आपण मुठीत पकडल्या जातो त्या कधीच मुठीत बंद होत नाही.. जसे त्या फुलपाखरा सारखे.. लहानपणी टाचणी , फुलपाखरू पकडण्यासाठी   धावायचो पण हातात कधीच यायचे नाही... 

या सर्व प्रश्नांची उत्तरे कदाचित आता मिळणार नाही... जेव्हा मिळतील तेव्हा उशीर झाला असेल .. जेव्हा  कधी हि माझ्या आयुष्याचा जमा खर्च काढतो तेव्हा ही जाणीव तीव्र होते..  माझा खर्च हा  जमा पेक्षा  जास्त आहे.. खूप काही  कमवण्यापेक्षा खूप काही गमावले आहे.. तेव्हा मला त्याची जाणीव नव्हती का ?  का अजून ही नाही आहे. 

मी आता पर्यंत एकच बजावतो आलो मनाला.. आपण पाण्यासारखे वाहते  असले पाहिजे , शेवाळ कधी साचता कामा नये..  मध्ये दगडा सारख्या आपत्ती आली तर त्या वर मार्ग काढून मार्गस्थ झाले पाहिजे ... नाहीच जमले तर त्याच्या बाजूने तरी वाट काढावी. 

तुम्ही बोलाल .. हे काय चालले आहे.. काय वेड लागल्या सारखे लिहित आहे...  मित्रांनो माझ्या मानला पडलेले प्रश्न आहेत खूप पूर्वी पासून.. .अजून ही उत्तरे शोधतो आहे.. 

मित्र हो  या सर्व  प्रश्नांची उत्तरे तुमच्या साक्षी ने सोडवणार आहे.. तुमची साथ असेल तर नक्की  जमेल... या ब्लोग मध्ये प्रत्येक नात्याचा, त्यातील हळवेपणाचा, त्या माणसातील मनाचा ठाव घेतला जाईल....   
ब्लोग वर लिहायचा हा माझ्या पहिलाच प्रयत्न आहे.. तुम्ही सांभाळून घ्याल ही अपेक्षा.. 

Sunday 28 August 2011

ओळख


सुरुवात ......
खूप दिवसापासून मनात होते पण ते प्रत्यक्षात उतरत 
नव्हते ... काय ते... लिखाण हो .. ते सुद्धा मराठीतून ... चला आज मुहूर्त मिळाला.. आज माझ्या मनाला मी वाट मोकळी करून देत आहे... बघूया कसे जमते ते ... तुम्ही वाचक सांभाळून घ्याल ही आशा आहे...
असो, माझी ओळख करून देतो ... त्या पासून सुरवात...:)
मी एक संगणक अभियंता.. software Engineer ... (Engineer शब्दाला खरंच value आहे का आज? मोठाच प्रश्न  ..... ).. असो मी काही Engineer होऊन मोठा पराक्रम केला आहे असे नाही वाटत.. आता पर्यंत सहा वर्षाचा अनुभव गाठीशी.. दर मजल करत इथ पर्यंत पोहचलो खरा ... . लंडनला... ब्रिटीशांच्या देशा मध्ये ... या मागे खूप मोठी कथा आहे...मोठा वाटतो प्रवास .. परंतु अजून बराच पल्ला गाठायचा आहे.. पुढे सगळे सविस्तर लिहिलं जाईलच ...
थोडे कुटुंब बदल ... दोनाचे चार हात झाले आहेत पण ते दोन हात भारतात आहेत.. :(  माझ्या लग्नाबदल  बोलतो आहे मी.... बघा ना  स्वप्नाच्या मागे धावतो आपण... आणि  काहीतरी गमावण्याची  किंमत  तर चुकवावीच  लागते.. पण Thanks to God.. wife च्या Support शिवाय.. विचारच करवतच  नाही.. ) आई वडील .. आणि भाऊ असा मध्यम वर्गीय परिवार..  
आता माझ्या ब्लोग च्या शीर्षका बदल.. विचित्र वाटते ना नाव.. ते सुद्धा   संस्कृत मधून .. 
अस्मिन् जन्मनि ..  in this life ... या जन्मा   मध्ये.. भाषांतर करायला गेले तर  हा अर्थ निघेल.. पण यात खूप काही आले.. हा ब्लोग फक्त माझ्या आयुष्यातील  घडामोडी बदल तर  नसेल.. त्यात तुम्हाला  तुमच्या आयुष्याचे  प्रतिबिंब दिसेल याची आशा आहे.. ..  बाकी शेक्सपिअर काहीही म्हणो ..

याच आयुष्यातातल्या  काही गोष्टी  सांगणार  आहे.. बघून जमते का.. ही माणसे.. हे  एक आयुष्य  खूप शिकवून जाते .. मी माझ्या आयुष्यातल्या  घडलेलेया वाईट अथवा चांगल्या   कडे सुद्धा सकारत्मक बघायला शिकलो ..  खरं  म्हणाल  तर आयुष्याने शिकवले..
आयुष्य एक circle आहे ... एक वर्तुळ आहे.. काही गोष्टी फिरून परत जीवनात  येतात.. देव आपल्याया हरलेला डाव परत जिंकायला देण्याची संधी देतोच ... नाहीतर दुसरी खिडकी उघडून देतो ..... फक्त आपण त्या गोष्टी कडे कसे react होतो ते महात्वाचे ..

चला आता पुरते इतकेच .. शुद्ध लेखनाच्या चुका सांभाळून घ्या ही विनंती.. Sorry वर्तक madam (शाळेत मराठी शिकवायच्या .. त्याच्या बदल ही पुढील लेखात )..



आपला 
Swap ..