Posts

Showing posts from November, 2024

AI आणि सैंडविच पिढी

AI आणि सैंडविच पिढी जसे जसे वय वाढत जाते तसे शरीर रुपी इंजिन जुने होत जाते. भोवतालील परिस्थिती आधुनिक तंत्रज्ञाने वेगात बदलत असते आणि जुन्या संकल्पना, विचार मोडत राहते. काही जण कुढत राहतात, परिस्थितीला दोष देत राहतात आणि आलेला दिवस पुढे ढकलत राहतात. पण काही जण बदल स्वीकारतात, आधुनिक तंत्रज्ञानाला आपलेसे करतात आणि वेगावर स्वार होतात. अश्याच स्वभावाची, आयरीन, सिंगापूरला राहणारी, चिनी वंशाची, आम्हाला दिवाळीच्या सुट्टीत, ट्रॉम्सोला (नॉर्वे) भेटली. वय हे फक्त नंबर आहे, याची पुरेपूर खात्री तिच्या स्वभावावरून आणि अथक बडबडण्यावरून पटते. तसे बघायला गेले तर ट्रॉम्सो हे काही नेहमीचे पर्यटन स्थळ नाही. उत्तर ध्रुवाजवळचे चांगली लोकसंख्या असलेले, नॉर्दन लाइट्सची राजधानी असा लौकिक असलेले आणि पृथ्वी च्या आर्टिक सर्कल मधले शहर. आता ऑक्टोबर/नोव्हेंबर मध्ये तापमान शून्याच्या वर जात नाही, मुसळधार, धुवांधार हे शब्द फिके वाटतील असा बर्फाचा मौसम चालू होण्याचा काळ. रात्रीची निवांत झोप आणि स्पॅनिश ऊनाची सवय असलेल्या माझ्यासारख्याला हे बर्फाळ पर्यटन लहान मुली बरोबर झेपणार नाही अशी खात्री असलेल्याने मी बायको ला...