ओळख
सुरुवात ...... खूप दिवसापासून मनात होते पण ते प्रत्यक्षात उतरत नव्हते ... काय ते... लिखाण हो .. ते सुद्धा मराठीतून ... चला आज मुहूर्त मिळाला.. आज माझ्या मनाला मी वाट मोकळी करून देत आहे... बघूया कसे जमते ते ... तुम्ही वाचक सांभाळून घ्याल ही आशा आहे... असो, माझी ओळख करून देतो ... त्या पासून सुरवात...:) मी एक संगणक अभियंता.. software Engineer ... (Engineer शब्दाला खरंच value आहे का आज? मोठाच प्रश्न ..... ).. असो मी काही Engineer होऊन मोठा पराक्रम केला आहे असे नाही वाटत.. आता पर्यंत सहा वर्षाचा अनुभव गाठीशी.. दर मजल करत इथ पर्यंत पोहचलो खरा ... . लंडनला... ब्रिटीशांच्या देशा मध्ये ... या मागे खूप मोठी कथा आहे...मोठा वाटतो प्रवास .. परंतु अजून बराच पल्ला गाठायचा आहे.. पुढे सगळे सविस्तर लिहिलं जाईलच ... थोडे कुटुंब बदल ... दोनाचे चार हात झाले आहेत पण ते दोन हात भारतात आहेत.. :( माझ्या लग्नाबदल बोलतो आहे मी.... बघा ना स्वप्नाच्या मागे धावतो आपण... आणि काहीतरी गमावण्याची किंमत तर चुकवावीच लागते.. पण Thanks to God.....