छोटी आणि सुंदर गावे, संत्र्यांच्या बागा, अल्गार्व, पोर्तुगाल (भाग ३)
(मराठी-English) अल्गार्व, पोर्तुगाल (भाग ३) जेव्हा तुम्ही युरोपमध्ये फिराल तेव्हा नेहमीची ठिकाणे करून झाल्यावर छोट्या छोट्या गावातून फेरफटका मारण्यासाठी वेळ राखून ठेवा. इकडे तुम्हाला काही बघण्यासाठी रांगेत उभे रहावे लागणार नाही, कोठेही वर्दळ दिसणार नाही, पण निवांतपणा जाणवेल. जुनी वयस्कर माणसे छोट्या छोट्या सुंदर कॅफे मध्ये बसून कॉफी/बियर चा आस्वाद घेताना दिसतील, लहान निर्मनुष्य गल्ल्या तुम्हाला गावचा निवांतपणा अनुभवायला देतील, घराच्या समोरच्या निटनेटक्या, आखीव रेखीव सुंदर बागा तुम्हाला घड्याळ पाहायची उसंतच देणार नाहीत, गावातले लहान पण उत्तम स्थितीत असलेले किल्ले तुम्हाला इतिहासाच्या गोष्टी सांगतील. हे सगळे पोर्तुगालमध्ये फिरताना जाणवते पण युरोपियन शैलीची (लाकडाची), ठराविक साच्याची घरे दिसत नाही. कदाचित पाच शतकांचा अरबांच्या अंमलामुळे येथील घरांवर, गावाच्या नावावर आणि संस्कृतीवर अरब संस्कृतीचा प्रभाव जाणवतो. त्यांनी तो बदलण्याचा किंवा ठिकाणांची नावे बदलण्याची उठाठेव केलेली दिसत नाही. इतिहास म्हणजे भुतकाळातील ओझी वर्तमानकाळात न नेता भविष्यकाळ चांगला करणे. ह्यातच शहाणपण असते. लहान ग...