नातं
आज खूप दिवसांनी खरडावसे वाटते आहे . का कळत नाही .. मनाचा भुंगा झाला आहे.. आपण ज्या साठी पळतो , ज्या स्वप्ना न साकारण्यासाठी जीवाचे रान करतो.. ते नक्की मिळेल का ... आज किती तरी गोष्टींचा त्याग करतो आहे.. फक्त एका ध्येयासाठी.. मग असे का वाटत राहते... जे ध्येय गाठण्यासाठी जो आटापिटा चालू आहे त्या साठी आपण कित्येक गोष्ट का गमावून बसतो आहे.. नाही कळत मनाला... कसे आवरणार मनाला.. कोणी समजून घेईल का.. कधी कधी खूप वाईट वाटते की आपण स्वतःला तरी न्याय देतो आहे का? का फक्त घडाळ्याच्या काट्यावर नुसते पळत राहणार... काहीतरी गमावत असल्याची जाणीव सारखी का जाणवत राहते.. मी नात्याला एक जवाबदारी मानून न्याय देतो आहे का.. मी कोणाचा मुलगा , कोणाचा नवरा , कोणाचा भाऊ लागतो आणि कोणाचा जिवलग मित्र ... मग त्या नात्याशी असणाऱ्या जवाबदारी ची जाणीव आहे का मला ... खरे सांगायचे झाले तर मला नाते ( ते कोण ते हि असो ) कधी निभावता आले नाही...अजून हि निभावता येत नाही ... मला तरी असे वाटते.. नातं निभावणे खूपच कठीण असते का? काही गोष्टी आपण गमावल्याबद्...