नातं

आज खूप दिवसांनी खरडावसे  वाटते आहे . का कळत नाही .. मनाचा भुंगा झाला आहे.. आपण ज्या साठी पळतो , ज्या स्वप्ना न साकारण्यासाठी जीवाचे रान करतो.. ते नक्की मिळेल का ... आज किती तरी गोष्टींचा त्याग करतो आहे.. फक्त एका ध्येयासाठी.. मग असे का वाटत राहते... जे ध्येय  गाठण्यासाठी जो आटापिटा चालू आहे त्या साठी आपण कित्येक गोष्ट का गमावून बसतो आहे..  नाही कळत मनाला... कसे आवरणार मनाला.. 
कोणी समजून घेईल का.. कधी कधी खूप वाईट वाटते की आपण स्वतःला तरी न्याय देतो आहे का? का फक्त घडाळ्याच्या काट्यावर नुसते पळत राहणार... काहीतरी गमावत असल्याची जाणीव सारखी का जाणवत राहते.. 
मी नात्याला एक जवाबदारी मानून न्याय देतो आहे का.. मी कोणाचा मुलगा , कोणाचा नवरा , कोणाचा  भाऊ लागतो आणि कोणाचा जिवलग मित्र ...  मग त्या नात्याशी असणाऱ्या जवाबदारी ची जाणीव आहे का मला ... 
खरे सांगायचे झाले तर मला नाते ( ते कोण ते हि असो ) कधी निभावता आले नाही...अजून हि निभावता येत नाही ... मला तरी असे वाटते.. 
नातं निभावणे खूपच कठीण असते का? काही गोष्टी आपण गमावल्याबद्दल त्याची किंमत त्यानंतरच  आपल्याला का जाणवते ... का त्या गोष्टीला परिस्थिती कारणीभूत असते .. नाही ठावूक या मनाला. ज्या गोष्टी आपण मुठीत पकडल्या जातो त्या कधीच मुठीत बंद होत नाही.. जसे त्या फुलपाखरा सारखे.. लहानपणी टाचणी , फुलपाखरू पकडण्यासाठी   धावायचो पण हातात कधीच यायचे नाही... 

या सर्व प्रश्नांची उत्तरे कदाचित आता मिळणार नाही... जेव्हा मिळतील तेव्हा उशीर झाला असेल .. जेव्हा  कधी हि माझ्या आयुष्याचा जमा खर्च काढतो तेव्हा ही जाणीव तीव्र होते..  माझा खर्च हा  जमा पेक्षा  जास्त आहे.. खूप काही  कमवण्यापेक्षा खूप काही गमावले आहे.. तेव्हा मला त्याची जाणीव नव्हती का ?  का अजून ही नाही आहे. 

मी आता पर्यंत एकच बजावतो आलो मनाला.. आपण पाण्यासारखे वाहते  असले पाहिजे , शेवाळ कधी साचता कामा नये..  मध्ये दगडा सारख्या आपत्ती आली तर त्या वर मार्ग काढून मार्गस्थ झाले पाहिजे ... नाहीच जमले तर त्याच्या बाजूने तरी वाट काढावी. 

तुम्ही बोलाल .. हे काय चालले आहे.. काय वेड लागल्या सारखे लिहित आहे...  मित्रांनो माझ्या मानला पडलेले प्रश्न आहेत खूप पूर्वी पासून.. .अजून ही उत्तरे शोधतो आहे.. 

मित्र हो  या सर्व  प्रश्नांची उत्तरे तुमच्या साक्षी ने सोडवणार आहे.. तुमची साथ असेल तर नक्की  जमेल... या ब्लोग मध्ये प्रत्येक नात्याचा, त्यातील हळवेपणाचा, त्या माणसातील मनाचा ठाव घेतला जाईल....   
ब्लोग वर लिहायचा हा माझ्या पहिलाच प्रयत्न आहे.. तुम्ही सांभाळून घ्याल ही अपेक्षा.. 

Comments

Popular posts from this blog

भारतीय क्रिकेटची पंढरी - वानखेडे, मुंबईकर क्रिकेट रसिक, हार्दिक पंड्या आणि गर्दी व्यवस्थापन

कॉबल स्टोन (Cobblestone) , पेव्हर ब्लॉक कला, किल्ले आणि डंकी ( भाग ४ आणि अंतिम)